पोलीस , असल्याची बतावणी  दुकानदारांना  गंडा

डोंबिवली  –  कल्याण डोंबिवली मध्ये पोलीस असल्याची,सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत दुकानंदाराना लुबाडण्याची घटना वाढल्या असून हे भामटे आता नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत.त्यातच कल्याण पश्चिमेकडील जैन सोसायटी परिसरात असलेल्या एका दुकानदाराला ला पोलीस असल्याची बतावणी करत तर एका किरणामालाच्या दुकानदाराला महापालिका अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल 24 हजार 800 रुपयांना गंडा घातला आहे या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कल्याण पश्चिम रामबाग परिसरात चिकणघर येथिल शिव परिसर सोसायटी मध्ये राहणारे गजानन गायकवाड यांचे जैन सोसायटी अनंत रिजेसी येथे साई पान शॉप व जनरल स्टोअर्स नावाने दुकान आहे .काल सकाळी आडे आठ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आला .पोलीस असल्याची बतावणी करत गायकवाड यांना  धक्का मारत दुकानातील गल्ल्या मधील 9 हजार 800 रुपये काढून तेथून निघून गेला .तर या नंतर काही कालावधीत त्याने न्यू चिकन घर येथे राहणारे हंसाराम चौधरी याच्या याच परिसरात असलेल्या धनलक्ष्मी सुपरमार्केट या दुकानात गेला .आपण महापालिकच अधिकारी असल्याचे भासवून दुकानातील गल्ल्यातून 15 हजारांची रोकड घेऊन तेथून निघून गेला .या दोन्ही दुकानदारांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यानी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email