पोटगी घेण्यासाठी आलेल्या सुनेचा विनयभंग; सासऱ्यावर गुन्हा
अंबाजोगाई – पतीपासून विभक्त राहत असल्याने पोटगी घेण्यसाठी अंबाजोगाईत विवाहितेस घरी नेऊन सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून सासऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
२००४ साली पिडीतेचे लग्न अंबाजोगाई येथील सदर बाजार भागात सोनार गल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत झाले होते. कालांतराने सासू-सासरे चांगले बोलत नसल्याने पीडिता आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होऊ लागला.
२०१२ साली तुझ्या पतीचा राग शांत होईपर्यंत तू माहेरी राहा म्हणून सासऱ्याने पिडीतेला परभणीला नेऊन सोडले. परंतु, २०१३ मध्ये थेट तिला घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली. त्यावेळेस पासून हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या पिडीता तिच्या १० वर्षीय मुलीला घेऊन पुणे येथे वास्तव्यास आहे. मधील काळात न्यायालयाच्या आदेशाने पिडीतेला साडेसात हजार रुपये पोटगी मंजूर करण्यात आली.
पीडीता पोटगीची रक्कम घेण्यसाठी अंबाजोगाई न्यायालयात आली असता सासऱ्याने तिला आपण घरी बसून चर्चा करून भांडण मिटवून घेउत असा बहाणा करून घरी नेले. दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी गेल्यानंतर तिथे कोणीच नसल्याची संधी साधून त्याने पिडीतेचा विनयभंग केला. पिडीतेने विरोध करताच सासऱ्याने तिला काठीने मारहाण केली असा घटनाक्रम पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीतेच्या सासऱ्यावर कलम ३५४, ३२३, ५०६ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. नागरगोजे करत आहेत.