पैसे घेऊन आमदार बनवणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश

(म.विजय)

ठाणे – ठाण्यातील भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना त्यांच्या एका कार्यकर्ताने माहिती दिली एक महिला पैसे घेउन विधान परिषदेची आमदारकी घेउन देते , डुंबरे यानी त्या महीलेशी संपर्क साधला असता त्या महीलेने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कड़े काम करत असुन येत्या जून जुलै 2018 मध्ये विधानपरिषद वर आमदारकी देऊ शकते , व तूम्हाला आमदारकी हवी असल्यास त्यासाठी तुम्हाला 10 कोटी रुपये टप्पा टप्पाने ध्यावे लागतील असे सांगुन , पहील्या ट्प्पा म्हणुन 25 लाख रुपये ध्यावे लागतील आणि 4 कोटी 75 लाख रुपये शपथ विधिपूर्वी व ऊरलेले 5 कोटी रुपये शपथ विधी नंतर दयावे लागतील असे सांगितले , डुंबरे यांना या व्यवहाराचा संशय आला त्यानी याचा छडा लावण्याचे ठरविले त्यानी या व्यवहराला होकार देउन आपला बायोडाटा त्याना दिला .या महीलेने हा बायोडाटा घेउन दिनांक 19/03/2018 रोजी संपर्क साधून तुमचा बायोडाटा मुख्यमंत्री यांनी अँप्रूव केला असुन् , कॉन्फरन्स कॉल वर मुख्यमंत्री स्वतः बोलत असल्याचे भासवून तीचा साथीदार अब्दुल फय्याज अंसारी याच्याशी बोलणे करून दिले त्याने हूबेहूब मुख्यमंत्री यांच्या आवाजात डुंबरे यांच्याशि बोलणे केले , तेव्हा डूंबरे यानी 25 लाख रुपये देण्याचे कबूल केले , व त्या बद्दलची तक्रार गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या कड़े दिली त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या कर्मचा-यानी सापळा रचला व दिनांक 20/3/2018 रोजी 4:30 वाजता तुलसी होटेल मध्ये महिला अनुद शीरगावकर हिला बायोडाटाची बनावट प्रत देउन 25 लाख रुपये स्वीकारताना रँगेहाथ पकडले , त्या महीलेच्या ताब्यात नँशनल इन्व्हेस्टिगेशन एजंसी भारत सरकार अशी तीच्या नावाची ओलखपत्र मिळाली , त्याच्या बरोबर काम करणारा अनिल कुमार भानुशाली वय 31 याला घन्सोली नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले , तीसरा आरोपी अब्दुल फय्याज अन्सारी वय 25 याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.