डोंबिवली – पेस्ट कंट्रोलच्या बहाण्याने घरात घुसून दोघा जणांनी घरातील दागिने चोरून नेल्याची घटना डोंबिवली पश्चिम येथे घडली डोंबिवली पश्चिमेकडील सुभास रोड न्यू सिंदूदुर्ग सोसायटी येथे राहणारे प्रमिला कचरे या महिलेच्या घरात काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सहदेव भोईटे व संदीप मुदलियार हे दोघे पेस्ट कंट्रोलच्या नावाने घरात आले .दरम्यान पेस्ट कंट्रोलचे काम सुरु असतांना कचरे हॉल मध्ये बसले असल्याची संधी साधत या दोघांनी घरातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून घरातून काढता पाय घेतला ,हे दोघे निघून गेल्या नंतर त्यांना घरातून चैन चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने कचरे यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सहादेव भोईटे व संदीप मुदलियार विरोधात गुन्हा दखल केला आहे.