पॅरोलवर सुटून फरार झालेला कैदी १७ वर्षांनी सापडला

ठाणे-येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पॅरोलवर कारागृहातून सुटला व नंतर कारागृहात परतलाच नव्हता . १७ वर्षांनंतर त्याला ठाणे गुन्हे शाखाने उत्तर प्रदेशमधून येथून अटक केली आहे. वेदप्रकाश वीरेंद्र सिंह (४८) असे या कैद्याचे नाव आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना १८ जून २००१मध्ये त्याला १४ दिवसांची पॅरोल रजा मिळाली व तो कारागृहातून बाहेर पडला आणि रजा संपल्यानंतरही कारागृहात परतला नाही. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.तो उत्तर प्रदेशात सुलतानपूर येथे असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशला जावून उत्तर प्रदेशच्या टास्क फोर्सची मदत घेऊन त्याला अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, पोलिस हवालदार भिलारे, सुनील जाधव, पोलिस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email