पॅन कार्डच्या बहण्याने बँके बाहेर बोलावून मारहाण करत 50 हजार लुबाडले 

डोंबिवली – कल्याण डोंबवली सह आसपासच्या परिसरात भामट्यानी एकच धुमाकूळ घातला असून नागरिकांना भूलथापा देत एका बाजूला देऊन मारहाण करत त्याच्याजवळील किमती ऐवज लुबाडण्याच घटना वाढल्या आहेत .दिवा पुर्वेकडील चालवि नगर श्रीसाई चाळीत राहणारे  दिलीप रविदास हे गत महिन्यात 29 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील चार रस्त्यावरील बँकेत 50 हजार रुपये रोकड भरण्यासाठी आले होते.याच दरम्यान दोन अज्ञात इसमांनि त्यांना स्लिप भरून देण्यास सांगितले .यावेळी रविदास यांनी त्यांना पॅन नंबर विचारला असता त्यांनी भाऊ बाहेर उभा आज त्याच्याकडे पॅन कार्ड असल्याचे सांगत रवीदास याना बाहेर नेले .बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या इसमाने त्याना मारहाण करत त्यांच्या खिशातील50 हजारांची रोकड काढून तेथून पळ काढला .या प्रकरणी रविदास यांनी काल डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात त्रिकुटा विरोधात गुन्हा नोंद केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email