पूर्ववैमनस्यातून चौकडीने केला तरुणावर हल्ला
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर त्रीमूर्ती चाळी मध्ये राहणारे ऋषिकेश पवार यांचे काही दिवसापूर्वी याच परिसारत राहणाऱ्या ऋतिक ठाकूर ,संकेत ठाकूर ,शानिदास म्हात्रे ,सचिन माळी याच्याशी भांडण झाले होते .काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश आपला मित्र साहिल शिंदे यांच्या सह भोईर वाडी येथील मैदान शेजारून जात असताना या चोघानी त्याला गाठले .ऋतिक ठाकूर ,संकेत ठाकूर ,शानिदास म्हात्रे ,सचिन माळी या चौघांनी ऋषिकेश व त्याच्या मित्राला शिवीगाळ करत ऋतिक ने आपल्याजवळील चाकूने ऋषिकेश वर वार केले तसेच आमच्या नादि लागला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली .या हल्ल्यात जखमी झालेल्या ऋषिकेश ने याबाबत विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी ऋतिक ठाकूर ,संकेत ठाकूर ,शानिदास म्हात्रे ,सचिन माळी या चौकडी विरोधात गुन्हा दाखल केला आहे .