पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

म विजय )

पुणे – यंदा प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यानिमित्त आज मंगळवार (दि.१०) वारजे माळवाडी भागातील भाजपचे मनपा स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी परिसरातील चार शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र करत, सर्वाना एकत्र प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह चित्तरंजन भागवत, सर्व शाळांचे प्रमुख, शिक्षक, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलता सचिन दांगट यांनी सांगितले की, दिवाळीच्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण केले जाते. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळीबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. याकरिता प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ २०१७ या उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले. राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमधील विद्यार्थी एकाच ठिकाणी आले, तर त्याची व्यापकता वाढेल आणि बंधुभाव वाढीस मदत होईल, याकरता एकाच ठिकाणी चार शाळांमधील विद्यार्थी एकत्र करून शपथेचा कार्यक्रम राबवल्याचे दांगट यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह चित्तरंजन भागवत यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश दिला. तर वारजे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सलीम नदाफ यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित दिवाळीचा संदेश दिला. माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी विद्यार्थ्यांनी पालकांना प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी उद्युक्त करण्याचे आवाहन केले. स्मिता पाटील विद्यालयाचे मुख्याद्यापक संतोष तनपुरे यांनी सूत्रसंचालन करताना, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना विषद करून, त्याचे आचरण करण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.

स्व मामासाहेब मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय वारजे, नवभारत ज्ञानवर्धिनीचे स्मिता पाटील विद्यालय, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (मॉडर्न शाळा), यशोदीप माध्यमिक विद्यालय या चार शाळांचे हजारो विद्यार्थी या “प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ २०१७” मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी मामासाहेब मोहोळ विद्यालयाचे मुख्याद्यापक किरण सूर्यवंशी, पर्यवेक्षिका सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी चौगुले, आनंदा दराडे, स्मिता पाटीलचे मुख्याद्यापक संतोष तनपुरे, वैशाली चव्हाण, वैशाली खरात, मॉडर्न शाळेच्या मुख्याद्यापिका अंजली पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप तीरकुंडे, यशोदीप शाळेच्या मुख्याद्यापिका मंगला जावळे, नीता मुंजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश देशमुख, भाऊसाहेब शिंगाडे, वैशाली शिंपी, लक्ष्मण मुळे, सारिका कांबळे, योगिता फाळके, कपिल देशमुख आदी शिक्षकांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तर भाजपाचे ज्ञानेश्वर ठाकर, वंदना नवघरे, मानसी कुलकर्णी, विनायक लांबे, शकील शेख, कल्याण नामुळे, विजय गांगर्डे, ऋषिकेश राजावत आदींसह वारजे भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होऊन, सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email