पुण्यात दहिहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून तरूणाचा खून

पुणे दि.०२ – दहिहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून तरूणाचा खून करण्यात आला. अक्षय हडशी असं या तरुणाचं नाव आहे. दहिहंडी उत्सवासाठी जागोजागी बॅनर लावले जातात पण आता हिच बॅनरबाजी अक्षयच्या जीवावर बेतली. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी- चिंचवडमध्ये दहिहंडीच्या बॅनरवरून वाद सुरू होता. त्याचाच राग म्हणून काल रात्री १.३० वाजता मानिक बाद कॉलनी सिंहगडरोड जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ काही तरूणांनी अक्षयवर तलवारीने वार केले आणि तिथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षयची ओळख पटवून घेत या घटनेबद्दल त्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी तीन जणांना हत्या केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं. अक्षयचा खून नेमका का केला, त्याला मारण्यामागे किती जणांचा हात आहे, या सगळ्याचा पोलीस तपास घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email