पुण्यातील बिबेवाडी येथील १०० झोपड्यांना आग

पुण्यातील बिबवेवाडी इथल्या आंबेडकर नगर  झोपडपट्टीमधे भीषण आग लागलीय.पुणे अग्निशमन दलाच्या 14 फायरगाड्या  आणि  3 वॉटर टँकर दाखल झालेत. शिवाय 4 रुग्णवाहिका आणि  2 जेसीबी तिथे आहेत.तसंच खाजगी किमान 8/10 वॉटर टँकर रवाना झालेत.

अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी व किमान 60/70 जवानांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी 3/4 सिलेंडर फुटल्याची स्थानिकांची माहिती आहे.

अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात रवाना केलंय.आगीमधे कोणी जखमी वा जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email