पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार -खासदार संजय काकडे
पुणे :पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार, अशी घोषणा भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी स्वतःच केली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत पुण्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहिर केल आहे.
पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापेक्षा आपण उजवे आहोत. तसंच पुण्यातील भाजपच्या आठ आमदारांपैकी चार आमदार डेंजर झोनमध्ये असून त्यांचा पराभव होऊ शकतो,” असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे. गेल्या २ वर्षात आपण पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारावर आपल्याला पक्षाकडून निश्चितपणे उमेदवारी मिळेल असे खासदार संजय काकडे यांना वाटत. मात्र आपल्याला संधी मिळाल्यास गेल्या वेळपेक्षाही अधिक मतांनी विजयी होऊ असा विश्वास काकडेंनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता भाजप कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
Please follow and like us: