पुणे विमानतळावर तब्बल ८६ सोन्याची बिस्किटे हस्तगत
दुबईवरून आलेले स्पाइसजेटचे विमान (एसजी-५२०) लोहगाव विमानतळावर एका प्रवाशाकडून सोन्याची तब्बल ८६ बिस्किटे हस्तगत करण्यात आले. या बिस्किटांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. दुबईवरून आलेले स्पाइसजेटचे विमान (एसजी-५२०) लोहगाव विमानतळावर उतरले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून तपासणी केली. त्या वेळी मोबाइल कव्हर आणि पुरुष शैचालयात लपवलेली सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यात १०.१७५ किलोग्राम वजनाची सोन्याची बिस्किटे होती. त्याची बाजारातील किंमत तब्बल तीन कोटी नऊ लाख ३४ हजार ६७५ रुपये आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली. पुढील कारवाईबाबत रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
Please follow and like us: