पीएफचे पैसे भविष्य निधी कार्यालयात न भरता परस्पर लांबवले,मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली – कामगारांचे भविष्य निधीचे पैसे भविष्य निधी कार्यालयात जमा न करता परस्पर अपहार केल्या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात डोंबिवली कोळेगाव परीसातील राज फेब्रीकेशन वर्क या कंपनीतील किशोर सिंह या  इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .डोंबिवली कोळेगाव येथील नामा पाटील चाळ येथे राज फेब्रीकेशन वर्क नावाने कंपनी आहे या कंपनी मध्ये कार्यरत असणाऱ्या कमर्चा-यांचा डिसेंबर १७  पासून ते एप्रिल १८ पर्यंत एकूण २८  हजार २१५ रुपये भविष्य निधी भविष्य निधी कार्यालयात जमा न करता स्वतःच्या फायद्या करीता वापरले .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भविष्य निधी कार्यलयात जमा न करता कामगारांची फसवणूक केल्या प्रकरणी किशोर सिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email