पिस्तूल विक्री करणा-याला अटक ; ३ पिस्टल आणि 13 काडतुसे हस्तगत
भिवंडी – पिस्तूल विक्री करणा-या एकला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ पिस्टल आणि 13 काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.नेतराजसिंग कासेसिंग जाधव (३१)असे या अटक करण्यात आलेल्या अरोपिचे नाव असून त्याच्याकडून ३० हजार रूपयांचे तीन पिस्टल,२६००रूपयांची १३ काडतूसे,रोख रक्कम,मोबाईल असा १ लाख ०८ हजार ०५० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.नेतराजसिंग हा स्वत: पिस्टल बनवित असल्याचेही तपासत समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी नेतराजसिंग कासेसिंग याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यास कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यास २ एप्रिल १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Please follow and like us: