पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या
पुणे – येथील पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा गळा चिरून हत्या करण्यात आलाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.निगडी परिसरातील पूर्णानगर भागात काल मध्यरात्री ही घटना घडली. वेदांत भोसले असं विद्यार्थ्यांचं नाव आहे.
वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता. मैत्रिणीसोबत अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडवण्यासाठी गेला. तेव्हा परत घरी येत असताना त्याच्या वर काही अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केले त्यातच त्याचा मृत्यू झाला.मात्र हल्लेखोर कोण होते आणि ही हत्या का करण्यात आली या बाबत अजून स्पष्ट झालं नाही. वेदांत हा उच्चभ्रू कुटुंबातील मुलगा होता. निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Please follow and like us: