पावसाच्या तोंडावर सागाव पुलाचे काम अर्धवट,डोंबिवलीकर नागरिकांचे हाल
पन्नास वर्षे जुन्या पुलाचे काम पावसाळा तोंडावर आला तरी अर्धवट
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील पन्नास वर्षे जुन्या पुलाचे काम पावसाळा तोंडावर आला तरी अर्धवट आहे. येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येणार असून यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत स्टार कॉलनी येथील नाल्यावर पन्नास वर्षे जुना पूल असून तो धोकादायक झाल्याने व लहान असल्याने तो रुंद करण्यात येत आहे हा पूल पावसापूर्वी पूर्ण करण्यात येणार होता मात्र या पूलाचे काम अजून पूर्ण झाले नाही येत्या पंधरा दिवसात १६ मीटर पैकी ८ मीटरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

रिक्षा चालकांची मनमानी
मानपाडा रस्त्यावर डोंबिवलीत प्रवेशासाठी हा पूल महत्वाचा असल्याने व तेाच बंंद असल्याने डोंबिवलीकरांचे हाल होत आहेत डोंबिवलीहून ग्रमीण भागात ये –जा करण्यासाठी नागरिकांना सुमारे अर्धा कि मी अंतर जास्त वळसा घालून जावे लागते यासाठी रिक्षा चालक मनमानी पैसे आकारणी करतात असा नागरिकांचा आरोप आहे
डोबिवलीहून सांगाव,नांदिवली,मानपाडा काटई आदि भागात जाण्यासाठी मोठा वळसा रिक्षा चालकांना मारावा लागत आहे मात्र रिक्षा चालक नागरिकांकडून जादा पैसे आकारणी करत असल्याची तक्रार आहे अजूनही पूलावरील महावितरण कपंनीच्या मुख्य उच्च दाबाच्या वीज वाहिन्या तशाच असून तो हलवल्याशिवाय पूलाचे काम रखडण्याची भिती आहे.
Please follow and like us: