पावणे चार वर्षे विस्थापित असलेल्या बिल्वदल रहिवाशीना न्याय द्या
डोंबिवली – नामदेव पाटील वाडीतील बिल्वदल इमारतीच्या खाबाला तडे गेल्याने पालिकेने तातडीने इमारत खाली करून इमारत जमीनदोस्त केली त्याला पावणेचार वर्षे झाली आम्ही विस्थापित असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी आज रहिवाशीआनी आयुक्त गोविद बोडके याची डोंबिवलीत भेट घेऊन केली
संजय मांजरेकर ,पंढरीनाथ पवार ,बिपीन मेहता ,अरुणा मांजरेकर ,वंदना चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने डोंबिवलीत आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यात वरील मागणी केली आहे
डोंबिवलीत बिल्वदल इमारत पाडल्यानंतर इतर पाडण्यात आलेल्या इमारतीतील रहिवाशीचे पुनवर्सन करण्यात आले मात्र आम्ही पावणेचार वर्षे विस्थापित असूनही आमचे पुनर्वसन केले जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आयुक्त बोडके यांनी शिष्टमंडळाला इमारतीची पुनरबाधणी करण्यासाठी प्लॅन एक दिवसात मजूर करण्याचे आश्वासन दिले मात्र जमीन मालक प्लॅन टाकत नाही याकडे लक्ष वेधले असता चौकशी करून तोडगा काढू असे त्यांनी सांगितले
Please follow and like us: