पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार

ठाणे – ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर हे आजपासून मसुरी येथे सुरु होणाऱ्या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी महिन्याभराकरिता गेले असल्याने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्याकडे ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

शनिवारी डॉ नारनवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबवावी, तसेच मतदार यादी शुद्धीकरणाला देखील वेग द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी  त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे देखील प्रकाशन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक फरोग मुकादम उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे,जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांची उपस्थिती होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email