पाण्यावरून दोन गावांत वाद पेटला
नेकनूर- तलावाच्या पाईपलाईनची काही लोकांनी नासधूस केल्याने पोखरी व भायाळ या दोन गावात वाद निर्माण झाला.या घटनेची माहिती नेकनूर आणि पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तगडा बंदोबस्त लावला.यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी गेले होते. चर्चेअंती काय ठरले, हे मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही.बांगरवाडा तलावातून भायाळा आणि पोखरी येथील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेली आहे. दोन-चार दिवसांपूर्वी भायाळाच्या काही लोकांनी पोखरीच्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तोडल्याने वाद निर्माण झालाया घटनेची माहिती नेकनूर आणि पाटोदा पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन गावातील हा वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून याठिकाणी तगडा बंदोबस्तही लावण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.हा वाद मिटविण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी दोन्ही गावांतील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी जाणार होते.