पाण्याच्या नळावर नंबर लावण्याच्या भांडणातून महिलेला कळशीने मारहाण
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२८ – पाण्याच्या नळावर पाणी भरण्यासाठी नंबर लावण्याच्या भांडणातून एका महिलेला माय लेकिने त्यांच्या कुटुंबाने पाण्याचा कळशीनेच बेंदम मारहाण करत धमकवल्याची घटना कल्याण पूर्व नांदीवली परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या वर्मा नावाच्या महिलेसह तिच्या मुलीवर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण पूर्वेत मलंग रोड नांदीवली येथील ढोणे चाळीत राहणाऱ्या प्रणाली गायकवाड या १ जून रोजी घराबाहेर नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या वर्मा नावची महिला पाणी भरत होती. नंबर लावण्यावरून वर्मा व प्रणाली यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या वर्मा या महिलेने तिच्या मुलीने मुलाने व या महिलेच्या मावशीने प्रणाली याना शिवीगाळ करत कळशीने डोक्यावर ,तोंडावर पाठीवर मारहाण करत त्यांना धमकी दिली .या हाणामारीत प्रणाली यानं दुखापत झाली असून त्यात या प्रकरणी काल कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी वर्मा नावाच्या महिलेसह तिची मुलगी,मुलगा ,व मावशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.