पाणी समस्येमुळे भोपर मध्ये काल रात्री दोन गटात हाणामारी
डोंबिवली – उन्हाळा तीव्र होत असताना ग्रामीण भागात पाणी समस्या उग्र होत असून काल रात्री भोपर गावात दोन गटात आपसात पाणी मिळवण्यासाठी वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली आहे
कल्याण शिवसेना ग्रामीण विभागाचे तालुका प्रमुख एकनाथ पाटील यांनी वरील माहिती दिली भोपरमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनत असून रोजग्रामस्थाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे सात आठ महिन्या पूर्वी हजारो नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला पाणी प्रश्नामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
Please follow and like us: