नंदुरबार मध्ये पाणी फाउंडेशनचा ब्रँँड अँबेसडर सिने अभिनेता आमिर खान
किरण राव आणि फिल्म अभिनेता रणवीर कपूरही उपस्थित
महाराष्ट्रच्या पाणी फाउंडेशनचा ब्रँँड अँबेसडर सिने अभिनेता आमिर खानने आज नंदुरबार जिल्ह्याच्या उमर्दे आणि दहिंदुले गावांचा दौरा केला या दरम्यान त्यांचा बरोबर त्यांची पत्नी किरण राव आणि फिल्म अभिनेता रणवीर कपूर हे उपस्थित होते. सकाळी ८:३० वाजता आमिर खान हेलिकॉप्टरने पोलिस मुख्यालच्या जवळच्या ग्राउंडवर उतरले, यादरम्यान ग्रामस्थ या सेलिब्रिटीजना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्याचं हलिकॉप्टर मधून आमिर खानची पत्नी किरण राव,आणि अभिनेता रणवीर कपूर पण उतरले.दौ-याची सुरूवात त्यांनी उमर्दे गाव येथून केली . उपस्थितांना पाण्याचे महत्व आणि याला वाचवण्याचे उपाय यावर आमिर खान आणि रणवीर कपूर यांनी मार्गदर्शन केलं.
या दरम्यान त्यांच्या सोबत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते. या दौ-यानंतर सिने अभिनेता आमिर खान ,किरण राव आणि रणवीर कपूर यांनी ग्रामस्थांंसमवेत बसुन खिचड़ी आणि मक्याच्या भाकरीचा आस्वाद घेतला.