पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने दिला मदतीचा हात
मुंबई :-ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबांना बसत आहेत. दिवाळीचे पाच दिवस संपल्यानंतर शिवसेनेने खाद्यपदार्थ बनवण्याच्या वस्तूंबरोबरच उटणं आणि दिव्यांची भेट दुष्काळी भागासाठी पाठवली आहे. दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने हा मदतीचा हात दिला आहे.
मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबांची या दुष्काळामुळे दयनीय अवस्था आहे. कुटुंबाला लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंची भेट दुष्काळी भागात देण्यात येणार आहे.यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
अशा अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड, लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबांना गहू आणि तांदूळ, पाच लिटर गोडेतेल, पाच किलो साखर, तीन किलो डाळ, दोन किलो रवा आणि मैदा, तीन किलो डालडा, उटणं आणि साबण अशा दिवाळी आणि गृहोपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत.