पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणार्‍याला कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न

ठाणे – मागील रविवारी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे या आरोपीची  मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली.

17 मार्च रोजी भांडूप येथीळ एका पाच वर्षाचे मुलीचे निर्मल झा या नराधमाने अपहरण करुन पातलीपाडा येथे नेले. तिथे निर्जनस्थळी त्याने या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, मुलीने आरडाओरडा केल्यामुळे मुलगी बचावली होती. या प्रकरणात जिजाऊ ब्रिगेडच्या शलाका नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्याला अटक केली होती. 

शुक्रवारी त्याला ठाणे न्यायालयात रिमांड घेण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश साळवी, चेतन टाकळे, विशाल गांगुर्डे, चंद्रशेख मनवडे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शलाका नाईक, स्वप्ना जाधव, चारुशिला पाटील, वैशाली भोसले, अनघा कोकणे यांना मिळताच त्यांनी कोर्ट परिसरात ठाण मांडले. सुनावणी नंतर आरोपी झा याला पोलीस घेऊ जात असतानाच सदर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करुन पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला चोप देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या संतापातून झा याची सुटका करुन त्याला बाहेर नेल्यामुळे तो बचावला. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email