पलावा सिटी येथील कासा-रिया परिसरातील स्वीमिंग पुलमधे बुडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

डोंबिवली –पलावा सिटी येथील कासा-रिया परिसरातील एका स्वीमिंग पुलमधे बुडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची नुकतीच घडली आहे.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानिया गुप्ता ही ५ वर्षीय बालिका पलावा सिटी येथील कासा-रिया परिसरातील एका स्वीमिंग पुलमधे पोहण्यासाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात गेली व बुडाल्याने तिचा मृत्यू झाला.शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी पोलिसांनी या स्वीमिंग पुलची देखभाल पहाणा-यावर गुन्हा नोंदवला आहे.

सद्ध्या अनेक संकुलांनी अनेक प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा सपाटाच लावला आहे.अनेक प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी अनेक संकुल निर्मात्यांची चढ़ाओढ़ सुरु असते.परंतु या सुविधांबरोबर सुरक्षा या विषयावर लक्ष देण्यात येते का ? हा विषयही महत्वाचा ठरतो.अनेक प्रकारचे अपघात होवू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करणेेही तेवढेच महत्वाचे आहे.परंतु सुविधा पुरवण्याच्या स्पर्धेत  सुरक्षा या विषयाकडे पुरेसं लक्ष न दिल्याने शहरातील विविध संकुलात या पुर्वीही विविध अपघात घडले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email