पर्यावरण दक्षता मंडळातर्फे देवराई वनीकरण वर्षपूर्ति कार्यक्रम

डोंबिवली –पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा,रुंदे येथे सुरु असलेल्या देवराई या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले.यानिमित्त संस्थेतर्फे २५ मार्च २०१८ रोजी वर्षपूर्ति स्नेह मेळावा आयोजित करण्यात अला आहे.

यात सकाळी ८ ते ९ झाडे लावणे,सकाळी ९:०० ते ९:३० वर्षभरात झालेले वनिकरणाचे काम पहाणे,९:३० ते१०:०० वर्षपूर्ति कार्यक्रम,१० ते ११ मामणोलीला निघणे,११ ते १२ मामणोली विभाग पहाणे,व १२ नंतर भोजन व परतीचा प्रवास असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.देवराई या वनीकरण प्रकल्पाला यशस्वी पणे सुरु ठेवण्यासाठी संस्थेला अनेकांचे सहकार्य लाभले आहे.आशा सर्वांनीही या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ८१०८६८९३९३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे,उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर व सरचिटणीस संगीता जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email