पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने आपले पर्यावरण फिल्म फरेस्टीवल २०१८ चे आयोजन

पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने आपले पर्यावरण फिल्म फरेस्टीवल २०१८ चे आयोजन २ ते ५ जून दरम्यान करण्यात आले आहे.पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था पर्यावरण दक्षता मंडळ पर्यावरण शिक्षण शोध व जागरूकता यांच्या प्रसाराचे काम  गेली ८ वर्षे करीत आहे.ठाणे व आसपासच्या परिसरात सदर कार्य सुरु असून पर्यावरण या विषयावर होणारा वार्षिक फिल्म महोत्सवदेखील याचाच एक भाग आहे.आपले पर्यावरण फिल्म फरेस्टीवल २०१८ मधे पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करणा-या मोजक्या डॉक्युमेंट्रि  पहावयास मिळतील.या प्रकरचे लघुचित्रपट पहाण्यासाठी सहज उपलब्ध होत नाहीत तसेच या माध्यमातून युवाकांचा पर्यावरणाकडे पहाण्याचा दृष्टिकोन अधिकच सकारात्मक व पर्यावरणास उपयुक्त असा बनतो.यातून अनेक युवक पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतात.ठाण्याच्या कोर्ट नाका येथील टाउन हॉल येथे सदर लघु चित्रपट महोत्सव संपन्न होणार असून २ जून रोजी त्याची सुरुवात होणार आहे.५ जून पर्यंत चालणा-या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन नोंदणी करावी असे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

खालील लिंक वर क्लिक करुन नोंदणी करावी

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUQRRnE_rGRAkMT2KC1nM0HgD5XuPNW8WV6iPLSb4rCKJwCg/viewform?c=0&w=1

 

Please follow and like us:
Pin Share

Hits: 20

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email