पर्यावरण कट्टा कार्यक्रमाचे आयोजन
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण कट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या कार्याक्रमात वरद सभागृह येथे शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी वीणा गवाणकर यांचे व्याख्यान, शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी मीनल मांजरेकर यांचे शहरी जैववैविध्य व त्याची जपणूक या विषयावर व्याख्यान तर रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी स्थानिक पर्यावरण समस्या व त्याची निराकरण या विषयावर खुली चर्चा असे कार्यक्रम असून सर्व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहेत. या पर्यावरण कट्टा कार्यकमात डोंबिवलीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष राहुल दामले यांनी केले आहे. तसेच महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिर रात्रो १.३० पर्यंत उघडे राहणार असून भक्तांनी बर्फाच्या बारा ज्योर्तिलिंगाचे महाशिवरात्री पर्वकाळात दर्शनाचा लाभ घ्यावा.