परिवहन सेवेचे खबालपाडा बस आगार 15 मार्च पर्यंत सुरू होणार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे डोंबिवली खांबालपाडा येथील बस आगार सध्या कचरा जमा करणाऱ्या गाडयांनी भरले असून येत्या 15 मार्च पर्यंत बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर त्या गाड्या ठेवून डोंबिवलीसाठी धावणा-या बसेस येथून सुटणार आहेत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत .
परिवहन समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्त पी वेलारासु यांची भेट घेऊन परिवहन सेवेच्या एकूण स्थितीबद्दल चर्चा केली डोंबिवलीत विविध भागात जाणाऱ्या बसेस कल्याण परिवहन आगारातून सुटतात यामुळे बसच्या फेऱ्या कमी होतात व उत्पन्न मिळत नाही जर डोंबिवलीसाठी असणा-या बसेस खांबालपाडा येथून सुटल्या तर फेऱ्या वाढतील व उत्पन्नही वाढेल याकडे वेलारासु याचे लक्ष वेधले त्यावेळी आयुक्तांनी 15 मार्च पर्यंत आगारातील गाड्या हलवण्याचे आदेश देऊन आगाराच्या आवारातील जमिनीचे सपाटीकरण करण्यात यावे व डोंबिवली बसेस खांबालपाडा येथे ठेवण्यात याव्यात व तेथून नियंत्रण करण्यात यावे असे निर्देश दिले .
तसेच खांबालपाडा आगारात डिझेल भरण्यासाठी पंप बाधण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे असेही निर्देश दिले .
खास सूत्रांच्या माहितीनुसार खांबालपाडा आगाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पैसे थकले असल्याने तो काम करण्यास विलंब करत असल्याचे समजते .
Hits: 15