परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा 76 वा जन्मोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण साजरा !

रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा 76 वा जन्मोत्सव सोहळा आज, 7 मे या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे औक्षण करण्यात आले. या वेळी श्रीसूक्त पठण, सामवेद गायन, पुष्पार्चन, विष्णुसहस्रनामाचे उच्चारण आदी धार्मिक कृती सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यानंतर विविध ज्योतिषीय नाडीपट्टीकांमध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी वर्णिलेले भविष्य सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी उपस्थितांना कथन केले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍या साधिकांनी स्तुतीगान आणि नृत्यसेवा समर्पित केली. या वेळी सनातनचे संत आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जन्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून देश-विदेशातील साधक-हितचिंतकांसाठी करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन आश्रमात 4 मे ते 8 मे या कालावधीत परिशिष्टोक्त यज्ञ, अघोरास्त्र होम, उग्रप्रत्यंगिरा होम, संधिशांती, राजमातंगी याग आणि साम्राज्यलक्ष्मी होम आदी विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले. जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरूंच्या सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता म्हणून सनातनच्या साधकांनी देशभरामध्येही मंदिर स्वच्छता, धर्मजागृती सभा, व्याख्याने, प्रवचने, हिंदूऐक्य दिंडी, शौर्य जागरण शिबिरे आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्म, साधना, राष्ट्र, धर्म आदी विषयांचे विचार प्रसारित करण्यात येत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email