परवडणारी घरे (नागरी) अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून घेतला आढावा

परवडणारी घरे (नागरी) अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून आढावा घेतला. मंत्री  प्रकाश मेहता, रवींद्र वायकर तसेच गृहनिर्माण, म्हाडा, एसआरए आणि अन्य शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. एसआरए नियमांमध्ये करण्यात आलेले बदल, नवीन डीसीआर नियम, म्हाडा योजनांचा पुनर्विकास, पीपीपी तत्त्वावर गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना, सीआरझेड नियमात करण्यात आलेले बदल इत्यादींबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. एसआरए योजनेंतर्गत मार्च 2019 पर्यंत 29,225 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसआरएच्या अधिका-यांनी दिली. एसआरएला अतिरिक्त पोलिस दल पुरविण्यात यावे तसेच पर्यावरण परवानगी ही सेवा हमी कायद्याच्या कक्षेत आणण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. म्हाडाला मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात नियोजन प्राधीकरणाचा दर्जा देण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, प्रलंबित प्रश्नांचा नियमित आढावा घेण्यासाठी नगरविकास आणि महसूल सचिवांची एक समिती गठीत करण्याचे निर्देशही दिले आहेत. बांधकाम गुणवत्ता राखण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देेशही त्यांनी यावेळी दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email