परळी-अंबाजोगाई महामार्गावर त्या’ ठिकाणी होणार मंदिर !
(म.विजय)
परळी – रस्ता कामासाठी खोदकाम सुरू असताना आढळून आलेली मूर्ती आणि मूर्तीच्या रक्षणासाठी असलेला साप हे दृश्य सोमवारी हजारो प्रवाशांनी परळी-अंबाजोगाई महामार्गावर पाहिले. मंगळवारी दिवसभर पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके यांनी पाहणी करून ही मूर्ती सुर्य भगवानाची असल्याचे सांगितले. आता या ठिकाणी मंदीर उभारले जाणार असल्याचे भाविकांनी सांगितले. हि जागा वाहिद खान यांच्या मालकीची असून मंदिरासाठी जागा देण्यास ते तयार असल्याचे समजते.
मूर्ती आढळल्यापासून या ठिकाणी भाविकांचा प्रचंड ओढा आहे. सध्या या ठिकाणी सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले आहे. सभामंडप तयार करण्यात आले असून परिसरात दुकाने स्टॉल लागले असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या जागेला धार्मिकदृष्ट्या महत्व प्राप्त होणार आहे. सध्या परळी-अंबाजोगाई या दरम्यानच्या महामार्गाचे करू सुरू आहे. सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने येथील डोंगरमाथ्याचे खोदकाम सुरू असताना अचानक सुर्य भगवानाची मूर्ती आढळून आली होती. एवढेच नाही तर या मूर्तीला नागाने विळखा मारला होता. मूर्ती हलिवण्याचा प्रयत्न जेसीबी चालकाने केला असता तो नाग फुसकारा टाकत चालकांच्या दिशेने येत होता. जणू काही मूर्तीच्या रक्षणच करण्याचे त्याने ठाणले होते. ही वार्ता वाऱ्यासाररखी कान्हेवाडीसह संंबंध तालुक्यात पसरली आणि ही आश्चर्यकारक बाबा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही वेळाने तर मूर्तीच्या दर्शनासाठी रांगाही लागल्या आणि रात्री या ठिकाणी किर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमही पार पडले.