परळीतील मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन स्थगित
परळी – मराठा क्रांती मोर्चाचं परळीतील ठिय्या आंदोलन 30 नोब्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या 21 दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर आज ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.
मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत परळी आंदोलनाचे केंद्र असेल आणि सरकारने इथेच येऊन चर्चा करावी. इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करावयाची आहे, ती येथूनच होईल, असे स्पष्ट मत परळीत या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मांडण्यात आली होती.
Please follow and like us: