पद्म पुरस्कार 2019 साठी 1200 हून अधिक नामनिर्देश प्राप्त, 15 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया खुली
नवी दिल्ली, – 2019 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन नामनिर्देश शिफारस करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. आतापर्यंत संकेतस्थळावर 1654 रजिस्ट्रेशन झाली असून 1207 नामनिर्देशने शिफारसी पूर्ण झाल्या आहेत. मे 2018 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश भारत रत्न आणि पद्म विभूषण सन्मानप्राप्त व्यक्ती यासह इतर स्रोतांकडून पद्म पुरस्कारासाठी नामांकने मागवण्यात आली आहेत. www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलद्वारेच नामनिर्देशने/शिफारसी स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी सर्व नागरिक स्वत:च्या नामांकनासह इतरांसाठीही शिफारस करू शकतात.
Please follow and like us: