पद्म पुरस्कार २०१९ साठी १०,००० पेक्षा जास्त नामांकने प्राप्त
नवी दिल्ली, दि.०४ – पद्म पुरस्कार २०१९ साठी १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन नामांकने/शिफारशी पाठवता येणार आहेत. १ मे २०१८ रोजी या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ११,४७५ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. त्यापैकी १०,४५३ जणांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, भारत रत्न आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते तसेच नावाजलेल्या संस्थांकडून ही नामांकने मागवण्यात आली आहेत. २०१९ साली प्रजासत्ताक दिनी या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर www.mha.nic.in अधिक तपशील उपलब्ध आहे.
Please follow and like us: