पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी,६ नोव्हेंबरपर्यंत मुदत
(श्रीराम कांदु )
ठाणे : पुढील वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदार संघासाठी पूर्वीची यादी न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रद्दबातल झाली असून २८ सप्टेंबर पासून नोंदणी सुरु झाली आहे. ६ नोव्हेंबर पर्यंतही नोंदणी सुरु राहिल. तसेच १९ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी केले आहे.
जुनी यादी रद्द केल्याने आता नव्याने यादी तयार करावी लागणार आहे. त्यामुळे जुन्या मतदारांनीही नव्याने अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यासाठी पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा व छायाचित्र हे अवघे चार पुरावे लागतात. त्यामुळे पदवीधारकांनी मोठ्या संख्यने जवळच्या मतदारनोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा.
मतदारांसाठी https://ceo.maharashtra.gov.in आणि http://thaneelection.com या संकेतस्थळांवर आवश्यक माहिती देण्यात आली आहे ती पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.