पत्री पूल तोडल्या मुळे वाहनांना वाहतूक कोंडीचा होणारा त्रास आता अंत्ययात्रेला देखील
( बालकृष्ण मोरे )
कल्याण / कल्याण च्या ऐतिहासिक पुलाला तोडून आता वर्ष होत आलंय मात्र वाहतूक कोंडी ची समस्यां दिवसेंदिवस वाढत आहे.ह्या यातना आता नागरिकांना मरण यातना होऊ लागल्यात. सूचक नाक्यावरील एक स्थानिक रहिवाशी मयत झाल्या नंतर त्यांची अंत्ययात्रा सूचक नाक्याहुन पत्रिपुल मार्गे बैल बाजार समशानभूमीत निघाली.
मात्र समशानभूमीत जाण्यास पूर्वी २० ते २५ मिनिटं लागायची पत्रिपुल तोडल्या नंतर तिथे एक तासाहून अधिक वेळ लागला पर्यायी वेगळ्या दिशेने नागरिकांनीच वाट काढून कशिबशी अंत्ययात्रा समशानभूमी पर्यत नेली .
ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाल्याचे सांगत हा लोखंडी पूल तोडण्यात आला.कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूल तोडला गेल्या मुळे या अगोदर जवळच बांधलेल्या अरुंद पुलावर दोन्ही बाजूची वाहतूक वळविण्यात आली. त्या मुळे येथे प्रचंड वाहतूक कोडी निर्माण झाली आहे.त्यात एखादी अंत्ययात्रा किंवा एखादा आजारी पेशंटची अंबुलेन्स जात असली तर अनेक तास येथे थांबावे लागते.
हा पत्रिपुल तोडून नवीन पूल बनविण्याचे भूमिपूजन एमएसआरडीसी ने पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम घेऊन पार
पाडले.या वेळी आठ महिन्यात पर्यायी पूल उभारला जाईल असे आश्वासन खुद्द पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, मात्र आठ महिने उलटूनही हा पर्यायी बनणारा पूल जैसे थे स्थितीत आहे.
पत्री पूल तोडला गेल्या मुळे वाहतूक कोंडी होत चालली आहे. या वाहतूक कोंडीच्या असह्य त्रासाला आता नागरिक कंटाळलेत ह्या अंत्ययात्रेत स्थानिक नागरिक आणि पत्रकार अशोक कांबळे ही होते त्यांनी ह्या प्रकाराबद्दल प्रशासनाविरुद्ध खेद व्यक्त केलाय. निवडणुकात फक्त आश्वासन देण्याचे काम केले जाते प्रत्यक्ष काम होत नाही अशी भावना आता पत्रिपुल तोडून नवीन पूल बांधण्याच्या या कामा मुळे होत नागरिकांत होत आहे.