पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी

मुंबई :ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं आहे, तर पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात विशेष मकोका न्यायालयाने निकाल देताना ९ जणांना दोषी ठरवलं आहे.सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, नयनसिंग बिस्त, मंगेश आगनावे, विनोद आसरानी, यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. जे डे हे इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकारिता करत होते. जे डे यांचा अंडरवर्ल्डविषयी मोठा अभ्यास होता. जे डे यांच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज देखील आलं होतं.मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email