पत्रकारांना पोलिसांकडून मारहाणीची चौकशी व्हावी,आ.डॉ.नीलम गो-हे यांची पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर कडे मागणी
( म विजय )
पोलिस आयुक्तांनी तात्काळ दखल घेत माहिती दिली. मुंबई, ता. २१ : काल दिनांक २० नोव्हेंबर २०१७ रोजी सायन रेल्वे स्टेशन परिसरात प्रशांत परब व इंद्रजित चोबे या दोन पत्रकारांना ते एका अपघाताची बातमीचे वार्तांकन करीत असतांना धारावी पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचा-यांना मारहाण केली आहे. हा अपघात घडला त्यापरिसरात दोन पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात हे दोन पत्रकारही होते. त्यांना अपघातस्थळावरून पोलिस स्टेशनला नेऊन त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले व त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून देण्यात आली. हा घडलेला सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाचा आढावा घेऊन संबंधितांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती पोलिस आयुक्तांना अा. डॉ. गो-हे यांनी केली आहे. यावर मुंबई पोलिस आयुक्तांनी तात्काळ प्रतिसाद दिला असून या घटनेचा योग्य तो तपास मध्यवर्ती विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात अाला असून याबाबत योग्य ती दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.