पत्नीला ठार मारण्याचा शिक्षकाचा प्रयत्न

भावासोबत माहेरी जात असल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून शिक्षक पतीने पत्नीला विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील सोमानगर येथे घडली. याप्रकरणी पत्नीच्या जबानीवरून शिक्षक पती मोहम्मद अबू यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहीना मोहम्मद अबू सुफियान अंसारी (२१ रा. सोमानगर ,धामणकर नाका ) असे विषारी द्रव्य पाजण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नी शाहीना ही सुट्टीच्या निमित्ताने तिच्याकडे आलेला लहान भाऊ मेहराज याच्यासोबत गोवंडी (मुंबई) येथील माहेरी जाते असल्याचे पतीला सांगितले. त्यावरून मनात राग धरून पती मोहम्मद अबू सुफियान मुस्तफा अंसारी याने पत्नीला ठार मारण्याच्या हेतूने घरातील कपडे धुण्याची ‘आला’ या विषारी द्रव्याची बाटली जबरदस्तीने शाहिना हिच्या तोंडात कोंबून तिला विषारी द्रव्य पाजले.

या घटनेनंतर बेशुद्ध पडलेल्या शाहिना हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिक्षक पती मोहम्मद अबू याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते करत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email