पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीची मारहाण – कल्याणमधील घटना

कल्याण दि.१३ – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या संशयी पतीने पिडीत पत्नीला मारहाण करत क्रूर वागणूक दिली. हा इथेच थांबला नाही तर त्यांने तिचे अश्लील फोटो काढत ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दीपक गोडे या पती विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

डोंबिवली परिसरात राहणाऱ्या या पिडीत महिलेचे कल्याण मलंग रोड येथील नांदिवली परिसरात राहणाऱ्या दीपक गोडे सोबत लग्न झाले होते. लग्न नंतर दीपक ने तिच्या चारीत्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत मारहाण करत क्रूर वागणूक देण्यास सुरुवात केली दीपक इथेच थांबला नाही त्याने चोरून सदर पिडीतेचे अश्लील फोटो व्हिडियो काढून ते सोशल मिडीयावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत तिच्या पर्स मधील मोबाईल काढून घेतला. या प्रकरणी सदर पिडीत महिलेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दीपक गोडे विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email