पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदीर्घ आयुष्य लाभावे, मात्र पेट्रोल व डिझेल चे वाढलेले दर १०० रुपयांपर्यंत वाढू नयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केक कापून निषेध
ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभावे, मात्र पेट्रोल व डिझेल चे वाढलेले दर १०० रुपयांपर्यंत वाढू नयेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोदी यांच्या वाढदिवसाचा केक कापून निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. अच्छे दिन येतील असे म्हणत ४ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सत्तेवर आले.
मात्र, त्यांच्या कारकिर्दीत पेट्रोल व डिझेलच्या इंधन दराने शंभरी गाठायची बाकी आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हे बुरे दिन आहेत. पंतप्रधानांनी वयाचे शतक गाठावे पण इंधन दराची शंभरी गाठू नये, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
Please follow and like us: