पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे – उद्धव ठाकरे

मुंबई दि.२८ – मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील. म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कुठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा, मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले. पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे.’

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email