न्यायालयीन आवारात कैद्यांची पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ
डोंबिवली – कल्याणात न्यायाल्याच्या आवारात न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या कैद्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात फिरोज खान ४५ त्याची आई बानू खान ५५ ,अजगर अली हसन ३२ त्याची पत्नी सालीया अजगर आली ठाकूर ३० या चार जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
काल दुपारच्या सुमारास ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले जे बी खताळ आपल्या सहकार्यांसह हे एका गुन्ह्यातील आरोप फिरोज खान ४५ त्याची आई बानू खान ५५ ,अजगर अली हसन ३२ त्याची पत्नी सालीया अजगर आली ठाकूर ३० या चार जणांना घेवून कल्याण न्यायालयात हजर करण्याकरिता घेवून आले होते यावेळी या चार आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालन्यास सुरुवात केली तसेच पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी खताळ यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी फिरोज खान ४५ त्याची आई बानू खान ५५ ,अजगर अली हसन ३२ त्याची पत्नी सालीया अजगर आली ठाकूर ३० या चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.