निसर्गाच्या प्रेमात पडलेल्या डॉ. महाजन यांनी काढलेल्या छायाचित्राचे फुलपाखरूंच्या प्रदेशात` प्रदर्शन  

(श्रीराम कांदु )
 डोंबिवली :- दि. २२  चिपळुन येथे निसर्गाच्या प्रेमात पडलेल्या  डॉ. राजेश महाजन  यांनी  फुलपाखरू , पतंग , चतुर , विविध रंगी कीटक , कोळी . माश्या याची छायाचित्रे  काढण्याचा छद असलेल्या डॉ. राजेश महाजन यांनी काढलेल्या छायाचित्राचे ` फुलपाखरूंच्या प्रदेशात` प्रदर्शन  डोबवलीत २५ तारखेला सकाळी ११ वाजता आनंद बालभवन येथे भरविण्यात येणार आहे. त्याचे फुलपाखरांची एवढी  आवड आहे हि त्यांनी  ` सेल्फी विथ फुलपाखरू`काढण्याचा मोह आवरता आला नाही.
         खान्देशात प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर  महाजन यांचे पुत्र डॉ. राजेश महाजन यांनी जगात फुपाखरांच्या १८ हजार पेक्षा जास्त जाती आहेत. भारतात विविध  १५०० जाती असून महाराष्ट्र राज्यात ३०० पेक्षा जास्त जाती असल्याचे सांगितले.  डॉ.  महाजन यांचा दैनंदिन नोकरीमधील कालावधी सोडल्यानंतर उर्वरित वेळ हा कोकणातील निसर्ग , प्राणी , पक्षीं, फुले  यांचे छायाचित्र काढण्यात जातो.  त्यातील सुमारे  २००  फुलपाखरांच्या हालचाली आपल्या कॅमेरात टिपून डॉ. महाजन यांनी आपलं छद जोपासला आहे. डोंबिवलीत सारख्या शहरातही डॉ. महाजन यांना अनेक फुलपाखराच्या जाती असल्याचे दिसले.आपली आवड जपासताना याची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मिळावी म्हणून डॉ. महाजन यांनी डोंबिवलीत प्रथमच ` फुलपाखरूंच्या प्रदेशात` प्रदर्शन भरवले आहे. विशेष म्हणजे डॉ. महाजन यांनी  पर्यावरणचा संदेश देताना  एका पुस्तकात `हिरवे रान हिरवे कोकण , रान वणव्याने मन`अशी कविता लिहिली आहे.डोंबिवलीत भरणाऱ्या प्रदर्शनात पतंग , फुलपाखरू व इतर घटकांचे जीवनचक्र , त्यांच्या विविध क्रिया तसेच ,वैज्ञनिक  माहिती मिळणार आहे. डॉ. महाजन यांनी भ्रमंतीतून कीटक , पतंग  आणि फुलपाखरांच्या अनेक जाती-प्रजातींची छायाचित्र  पहावण्यास मिळणार आहेत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email