निवासी उपजिल्हाधिकारीपदी शिवाजी पाटील रुजू

ठाणे – ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी शिवाजी पाटील हे रुजू झाले आहेत. यापूर्वी ते उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून ठाण्याचे काम पहात होते.

शिवाजी पाटील यांची प्रशासकीय कारकीर्द २००२ पासून रायगड येथून सुरु झाली. २००५ च्या अतिवृष्टीच्या काळात महाड परिसरात मोठी हानी झाली होती तसेच दरडी कोसळल्याने माणसे आणि घरेही गाडली गेली होती. महाड येथे प्रांत अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या शिवाजी पाटील यांनी या अभूतपूर्व अशा अस्मानी संकटात तत्परतेने मदत कार्य सुरु केले होते एवढेच नव्हे तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शासनाचा एकही पैसा खर्च न होऊ देता अतिशय कमी कालावधीत ४०० घरे बांधून लोकार्पंही केले होते. या वैशिष्ट्यपूर्ण कामाबध्द्ल त्यावेळेसचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांनी देखील त्यांचा विशेष गौरव केला होता.

तद्नंतर त्यांनी मुंबई उपनगर येथे ४ वर्षे अतिक्रमण निष्कासन विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.  तर पुढील ३ वर्षे त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पद सांभाळावयास मिळाले. त्यानंतर शिवाजी पाटील यांनी कामगार मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून वर्षभर जबादारी सांभाळली. आणि २०१६ मध्ये ठाणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे काम पाहताना या प्रकल्पाला ठाण्यात गती देण्याचे महत्वपूर्ण काम केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email