निर्मल इंग्लिश स्कुलचा निकाल शंभर टक्के
कल्याण तालुक्यात फळेगावची कीर्ती जाधवला 95 टक्के गुण मिळवून पहिली
टिटवाळा – कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातून 95 टक्के गुण मिळवून फळेगाव येथील कीर्ती ज्ञानेश्वर जाधव ही मुलगी शाळांत परीक्षेत पहिली आली आहे, ती शेतकरी कुटुंबातील असून इंग्लिश माध्यमाच्या निर्मळ इंग्लिश स्कुल ची ती विद्यार्थी नी आहे, या शाळेचा निकाल यावर्षी ही 100 टक्के लागला आहे, गोवेली येथ निर्मल इंग्रजी शाळेचा .सुबोध मिरकुटे याने 90.60 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला.90.40 टक्के प्राप्त करून ऋतिका व्यापारी हिने तृतीय क्रमांक मिळविला.तर सारंग बुटेरे याने 90 टक्के मिळविले.सलग दोन वर्षे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.येथील वाहोली उर्दू स्कुल चा निकाल शंभर टक्के लागला आहे, .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे याकरता जीवनदीप शैक्षणिक संस्थेने निर्मल इंग्रजी शाळेची स्थापना केली.ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमात कुठेही कमी नाहीत हे या शाळेच्या निकालावरून दिसून येते. अभ्यासा सोबतच शाळेतील विद्यार्थी कला व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, आणि प्राचार्य नरेश जाधव यांनी अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.तर येथील जागृती विद्यालयाचा निकाल 91 टक्के लागला आहे तर या विद्यालयाची शीतल शेलार ही विद्याथिनी पहिली आली आहे, येथील गंगा गोरजेश्वर विद्यालय फळेगाव चा निकाल ,,93 टक्के लागला आहे, तारमले 90 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे, शंकूतला विद्यालय टिटवाळा चा निकाल93 टक्के लागला आहे, ममनोली विद्यालय चा निकाल 93 टक्के, घोटासइ माध्यमिक शाळा 72 टक्के, सिक्रेट हार्ट स्कुल 87टक्के लागला आहे, मारलेश्वर विद्यालय म्हारल चा निकाल 97 टक्के लागला आहे, ग्रामीण भागातून यावर्षी शालान्त परीक्षेला 1 हजार 133 विद्यार्थी बसले होते ,त्यामधून 1 हजार 019 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.