नागरी सेवा दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे वेबकास्टद्वारे प्रक्षेपण
ठाणे – काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे १२ वा नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे वेबकास्टद्वारे प्रक्षेपणही करण्यात आले. नियोजन भवन सभागृहात हे भाषण पाहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती.
तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी ‘डिस्कनेक्ट’ होऊ नका, आणि प्रशासनात काम करीत असतांना सातत्याने काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. २०२२ साली भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतात, यानिमित्ताने आपण जिथेही असाल तिथे देशाला आणि पर्यायाने समाजाला काही ठोस देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचे जीवन बदलवा हा प्रधानमंत्र्यांच्या भाषणातील संदेश उपस्थितांना प्रभावित करून गेला.प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी बीड जिल्हाधिकारी पुरस्कार स्व्कारात होते तेव्हा उपस्थितांनी देखील टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट केला.यावेळी मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी नागरी सेवा दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.नागरिकांना प्रामाणिक आणि चांगली सेवा देण्याविषयी वक्ते देशमुख यांनी देखील आपले विचार मांडले.