नांदेड जिल्ह्यात एकाच मंडपात एकाच युवकाचे दोघी बहिणींशी लग्न
नांदेड : एखाद्या व्यक्तीचे चौथे लग्न किंवा एकाला पाच सहा बायका असल्याचे आपण आजपर्यंत ऐकले आहे, पण, एकाच मंडपात दोघींशी विवाह ही बाब कधी ऐकली ही नसेल.मात्र अशीच एक गोष्ट नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरमाळा येथे झाले आहे.मतिमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कोणी तयार नसल्यामुळे धाकट्या बहिणीने मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्याशी लग्न करायचं असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावं, अशी अटच तिने घातल्यामुळे साईनाथ उरेकर यानी दोन्ही बहिणींशी विवाह केला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या या विवाहाचे फोटो आणि लग्नाची पत्रिका देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
Please follow and like us: