नांदीवली मधील रस्ता खचल्याने स्कुल व्हॅन रुतली विद्यार्थी नसल्याने दुर्घटना टळली
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२५ – काही दिवसांपूर्वी नांदीवली येथील मुख्य रस्त्याचे काम।पूर्ण करत नागरिकांना दिलासा दिला असला तरी रस्त्यालगतच्या गटाराच्या कामांचा पालिका प्रशासनाला विसरला पडला होता .नागरिक व लोकप्रतिनिधीच्या रेट्यामुळे या रस्त्यामधील नाल्याचे काम काल हाती घेण्यात आले मात्र काल पासून पावसणारे जोर धरल्याने आज सकाळी मुलांना शाळेत सोडून येणारी स्कुल व्हॅन या रस्त्यात रुतली सुदैवाने विद्यार्थी नसल्याने दुर्घटना टळली .मात्र प्रशासणाचा लेटलतीफ व नियोजनहीन कारभार आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे
उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने ७ वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही निधी नसल्याचे कारण देत कल्याण पूर्व मलंग रोड नांदिवली गावाकडे जाणर्या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डागडुजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भरविलेल्या महाआरोग्य शिबिर स्थळी जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती केवळ १६ तासात पूर्ण करण्याची किमया प्रशासनाने साधली होती . दरम्यान रस्ता तयार झाल्याचा नागरिकांना आनंद असला तरी गटारांची कामे मात्र दुर्लक्षित करण्यात आल्याने नागरिकांसह ,या परिसरातील शाळांनी पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी महापौरांना निवेदन देत कामे पूर्ण करण्याची मागणीं केली होती .मात्र महिना भर या कामाकडे पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांनी दुर्लक्ष केले .त्यातच या रस्त्याच्या मधोमध एक नाला गेला असून या नाल्याचे काम रखडले होते .त्यावर मातीचा मुलामा देण्यात आला होता .काल या ठिकाणी पाईप टाकून पुन्हा मातीचा मुलामा देण्यात आला .काल रात्री पासून पावसाने जोर धरल्याने या मातीचा चिखल झाला आज सकाळी नजीक अल्सलेय शाळेमध्ये स्कुल व्हॅन मुलांना सोडून परतत असताना या ठिकाणी गाळात रुतली सुदैवणे या व्हॅन मध्ये मूल नसल्याने दुर्घटना टळली .त्यामुळे आता प्रशासनाचे डोळे उघडतील का ?तत्काळ हे काम पूर्ण होईल का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .